खरी गुरुपौर्णिमा !

परात्पर गुरु पांडे महाराज

‘सूर्यकिरणांद्वारे आपल्याला सर्वत्र प्रकाशमय वातावरण दिसते. या प्रकाशामध्ये चैतन्यशक्ती आहे. तिचा आपण विज्ञानाद्वारे उपयोग करत आहोत, उदा. पाणी तापवणे, वीज निर्माण करणे, अन्न शिजवणे इत्यादी. हाच नियम लक्षात घेऊन वातावरणात सर्वत्र ईश्‍वराचे चैतन्य आहे. त्या चैतन्याला गुरुकृपेने अष्टांग साधना करून आपल्या शरिरात एकत्रित करायचे आहे; म्हणूनच ज्ञानेश्‍वर म्हणतात, ‘हरि मुखे म्हणा । हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥’ आपल्यामध्ये अशा रितीने चैतन्याचा साठा निर्माण झाल्यानंतर वातावरणात निर्माण झालेली सध्याची रज-तमाची विकृती नष्ट होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचे असाध्य कार्य गुरुकृपेने आपोआप होणार आहे. आपल्या हातून होणार्‍या खारीच्या सेवेने आपला उद्धार होऊन आपण जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटणार आहोत. यासाठी ‘प्रत्येक क्षण सेवेद्वारे भगवंताच्या अनुसंधानात कसा राहील ?’, हे जाणून सेवा केल्यास ती गुरुचरणी अर्पण होऊ शकते. अशा प्रकारे सेवा झाल्यास ती गुरुचरणी अर्पण होणे, म्हणजेच खरी गुरुपौर्णिमा साजरी करणे होय.’

– (परात्पर गुरु) पांडे महाराज (२६.६.२०१७)

‘माया ही केवळ भगवंतप्राप्तीसाठी साधन आहे’, हे लक्षात ठेवून गुरुकृपायोगाद्वारे साधना केल्यास भगवत्प्राप्ती सुलभ होते !

‘सेवा करतांना सेवेतील सत्-चित्-आनंदमय भगवंताचे स्मरणच शाश्‍वत आहे. त्यामुळे मृत्यूसमयी भगवंताचे स्मरण केल्यास त्याच्याशी संलग्न होणे सुलभ होते. अन्यथा मायेच्या विचारात राहिल्यास व्यक्ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकतेे. यासाठी ‘माया ही केवळ भगवंतप्राप्तीसाठी साधन आहे’, हे लक्षात ठेवून गुरुकृपायोगाद्वारे साधना केल्यास भगवत्प्राप्ती सुलभ होते. गीतेतील ८ व्या अध्यायातील १३ व्या श्‍लोकात म्हटले आहे, ‘मृत्यूसमयी भगवंताचे स्मरण करून देह सोडतो, त्याला परम गती प्राप्त होते.’

– (परात्पर गुरु) पांडे महाराज (२६.६.२०१७)


Multi Language |Offline reading | PDF