सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीच्या नावे प्रसारित होणार्‍या श्री साईबाबा यांच्यावरील टीकात्मक संदेशाशी हिंदु जनजागृती समितीचा संबंध नाही !

समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि साईभक्त यांना निवेदन !

श्री. रमेश शिंदे

सध्या सामाजिक संकेतस्थळावरून श्री साईबाबा यांच्यावर अश्‍लाघ्य भाषेत टीका करणारा, तसेच त्यांनी केलेल्या चमत्कारांना खोटे ठरवणारा एक संदेश प्रसारित (पोस्ट) होत आहे. या संदेशात श्री साईबाबा यांच्यावर टीका करतांना कथित अध्यायांचा संदर्भही देण्यात आला आहे. हा संदेश हिंदु जनजागृती समितीच्या नावाने प्रसारित होत आहे. तथापि या संदेशाशी हिंदु जनजागृती समितीचा कोणताही संबंध नाही. समितीने असा कुठलाही संदेश प्रसारित केलेला नाही, याची समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि साईभक्त यांनी नोंद घ्यावी.

या माध्यमातून ही पोस्ट सर्वत्र फिरत आहे ….

(छायाचित्रे वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करावे.) हिंदु जनजागृती समितीच्या नावाने व्हाट्सअपवर अपप्रचार करण्यात येणारी हीच ती पोस्ट !

हिंदु जनजागृती समितीच्या नावे खोटा संदेश प्रसारित करून समितीची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी समिती अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.


Multi Language |Offline reading | PDF