भारताने सीमेजवळील लढाऊ विमाने मागे घेतली, तरच आमचा आकाश मार्ग उघडू ! – पाक

शाहरुख नुसरत

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत सरकारने आम्हाला आकाश मार्ग मोकळा करावा यासाठी संपर्क साधला आहे; मात्र जोपर्यंत भारत सीमारेषेजवळ असलेल्या त्याच्या वायूदलाच्या तळांवरील लढाऊ विमाने मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही प्रवासी विमानांसाठी आकाश मार्ग उघडणार नाही, असे आम्ही भारताला सांगितले आहे, अशी माहिती पाकचे हवाई उड्डाण खात्याचे सचिव शाहरुख नुसरत यांनी संसदीय समितीला दिली. पाकमधील ‘डॉन न्यूज’ने याविषयीचे वृत्त दिले आहे. भारताने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’नंतर पाकने भारतीय विमानांसाठी त्यांचा आकाश मार्ग बंद केला आहे.

त्यामुळेे भारताला सध्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असून मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

याशिवाय भारताने पाकसाठी त्याचा आकाश मार्ग चालू केल्याचा दावा नुसरत यांनी फेटाळून लावला. ‘भारतीय आकाशमार्ग बंद असल्याने थायलंडमधून उड्डाण करणारी पाकिस्तानी सेवा अद्यापही चालू करण्यात आलेली नाही. मलेशियातील पाकिस्तानी विमान सेवाही बंद आहे’, असेही त्यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF