देहलीच्या आम आदमी पक्षाकडून अमेरिकेने हेरगिरीच्या प्रकरणी काळ्या सूचीत टाकलेल्या आस्थापनाला सीसीटीव्ही लावण्याचे कंत्राट

देशाच्या राजधानीला संकटात टाकण्याचाच हा प्रयत्न आहे ! केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून राजधानीची सुरक्षा कायम रहाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

नवी देहली – देहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने अमेरिकेतील आस्थापन ‘प्रमा हिकव्हीजन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ला राज्यात दीड लाख सीसीटीव्ही लावण्याचे कंत्राट दिले आहे. या आस्थापनावर अमेरिकेने हेरगिरीचा आरोप करून तिला काळ्या सूचीत टाकलेले आहे. या आस्थापनामध्ये ५८ टक्के सम भाग (शेअर्स) चीन सरकारचे आहेत. इंग्रजी वृत्तवाहिनी ‘टाइम्स नाऊ’ने हे वृत्त प्रसारित केले आहे. ही माहिती समोर आल्यावर भाजपने आम सरकारवर टीका केली आहे. भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याचा आरोप केला आहे.

या आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक आणि विशेष कार्यकारी अधिकारी आशीष धाकन म्हणाले की, आमच्या सीसीटीव्ही भारतातच बनवलेल्या आहेत आणि त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. याद्वारे होणारे चित्रीकरण चीनमध्ये पाठवण्यात येणार नाही. आम्ही या कंत्राटाच्या संदर्भात भारतीय सुरक्षेविषयीचे प्रमाणपत्र मिळवलेले आहे.


Multi Language |Offline reading | PDF