५ सहस्र रुपयांसाठी ‘फेसबूक’वरील विदेशी मैत्रिणीला गोपनीय माहिती पुरवणार्‍या सैनिकाला अटक

काही रुपयांसाठी देशद्रोह करणार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

चंडीगड – ५ सहस्र रुपयांच्या मोबदल्यात ‘फेसबूक’वरील एका विदेशी मैत्रिणीला देशाच्या संरक्षणाविषयीची गोपनीय माहिती पुरवणार्‍या रवींद्र या ‘५ कुमाऊ रेजिमेंट’च्या सैनिकाला अटक करण्यात आली. तो हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील बसई या गावाचा रहिवासी आहे. रवींद्र अविवाहित असून त्याचा मोठा भाऊही सैन्यात आहे.

रवींद्रकडून ७ जिवंत काडतुसे, २ भ्रमणभाष संच आणि ३ ‘सीमकार्ड’ जप्त करण्यात आले आहेत. ‘रवींद्र पाकिस्तानी सैन्याधिकार्‍यांच्या संपर्कात असण्याची शक्यता नाकारता येत नाही’, असे पोलिसांनी सांगितले आहे. संबंधित मैत्रिणीचे नाव पोलिसांनी उघड केले नाही.


Multi Language |Offline reading | PDF