गेल्या ३ मासांत पाकमध्ये अल्पसंख्यांक समाजांतील ३१ तरुणींचे अपहरण

हिंदू, शीख आणि ख्रिस्ती यांच्याकडून निदर्शने

पाकमधील अल्पसंख्यांक समाजातील लोकांविषयी भारतातील पाकप्रेमी कधीच तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील धर्मांधांकडून अल्पसंख्यांक (हिंदू, शीख आणि ख्रिस्ती) समाजातील लोकांवर अत्याचार चालूच आहेत. गेल्या ३ मासांमध्ये पाकच्या सिंध प्रांतात अल्पसंख्यांक समाजांतील ३१ तरुणींचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीस अपहरणाच्या तक्रारींची नोंदही करून घेत नाहीत. उलट ‘तरुणी स्वतःहून धर्मांतर करून विवाह करतात’, असे सांगितले जाते. त्यामुळे हिंदू भारतात येत आहेत. इतकेच नव्हे, तर अल्पसंख्यांकांची तेथील संपत्ती अल्प मूल्यात विकण्यासाठीही त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे याविरोधात गेल्या आठवड्याभरात हिंदू, शीख आणि ख्रिस्ती यांनी निदर्शने केली आहेत.

१. कराची येथील ‘थारपारकर वेलफेयर ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष डॉ. बाबूदान म्हणाले की, भारताच्या ‘एअर स्ट्राईक’च्या कारवाईनंतर अशा घटनांत वाढ झाली आहे. येथील अल्पसंख्यांकांसाठी आता भारतच सुरक्षित स्थान आहे. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून हिंदूंचे रक्षण करण्याची व्यवस्था करावी.

२. काही दिवसांपूर्वी पाकच्या हैदराबादमध्ये एका पोलीस अधिकार्‍याची पत्नी येथील एका गुरुद्वारामध्ये घुसली आणि तिने शिखांना पूजा करण्यापासून रोखले. केवळ तिच्या झोपेमध्ये बाधा आल्याने तिने असे केले. या वेळी तिने भाविकांना शिवीगाळही केली.

३. थारपारकर भागामध्ये ३७ भील परिवारांचे एकाच वेळी धर्मांतर करण्यात आले. त्यांना एका मौलवीने ‘येथे रहायचे असेल, तर इस्लाम स्वीकारावाच लागेल’, अशी धमकी दिली होती.


Multi Language |Offline reading | PDF