पाकिस्तानच्या हैदराबाद प्रांतामध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर

इस्लामी राष्ट्र असलेल्या पाकमध्ये अल्पसंख्यांक हिंदू असुरक्षित !

हैदराबाद – पाकिस्तानच्या हैदराबाद प्रांतातील बखशो लघारी गावामध्ये एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर तिचा सय्यद इरशाद शहा नावाच्या व्यक्तीशी विवाह लावून देण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. मुलीच्या वडिलांनी मुलीच्या अपहरणाविषयी हूसरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी २ धर्मांध आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी पसार झाला आहे.
युरापीयन संसदेच्या सदस्यांनी नुकताच पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांच्या वेदना दर्शवणारा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये पाकिस्तानमध्ये प्रतिवर्षी १ सहस्र अल्पसंख्यांक मुलींचे बलपूर्वक धर्मांतर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

 


Multi Language |Offline reading | PDF