फुटीरतावाद्यांच्या बंदमुळे १३ जुलैला अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

फुटीरतावादी नेते कारागृहात असतांना त्यांच्या कार्यकर्त्यांना बंद पाळून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यासाठी कोणाचा पाठिंबा मिळतो ?

श्रीनगर – फुटीरतावाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये बंद पुकारल्याने १३ जुलैला अमरनाथ यात्रा एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली. त्यामुळे भाविकांना जम्मूतून काश्मीर खोर्‍याकडे जाण्यास अनुमती नाकारण्यात आली.

बंदमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊन भाविकांना त्याचा त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF