‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाला एप्रिल २०१९ मध्ये भेट देणार्‍या जिज्ञासूंचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’ या जागतिक स्तरावर अध्यात्माचा प्रसार करणार्‍या आध्यात्मिक संस्थेविषयी विविध देशांतील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय येथे देत आहोत.

१. एस्.एस्.आर्.एफ्. फेसबूक

१ अ. एस्.एस्.आर्.एफ्. इंग्रजी फेसबूक

१ अ १. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या ज्ञानात सत्यता आहे ! : ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ने प्रकाशित केलेले आध्यात्मिक ज्ञान शास्त्रीय संशोधनावर आधारित असून त्यात सत्यता आहे. त्यामुळे ‘एस्.एस्.आर्.एफ्.’कडे मी आकर्षित होते. त्यांच्या या चांगल्या कार्यामागे दैवी बुद्धीमत्ता असल्यामुळे ‘हे ज्ञान सत्य आणि चिरंतन आहे’, याची मला जाणीव झाली आहे.’ – कनिका मनकोटिया, भारत

१ अ २. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’मुळे जीवनशैलीत सकारात्मक पालट झाले ! : ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाशी परिचय झाल्यावर मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला आरंभ केला, तसेच माझ्या जीवनशैलीत अध्यात्माच्या दृष्टीने पालट करण्याचाही प्रयत्न करत आहे. मला पुष्कळ नवीन सूत्रे शिकायला मिळत आहेत आणि त्यामुळे माझ्या जीवनशैलीत सकारात्मक पालट होत आहेत.’ – कु. रिचा अब्रॉल

१ अ ३. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संकेतस्थळ पर्शियन भाषेत आवश्यक ! : ‘पूर्वी आपण पर्शियन भाषेतही माहिती प्रकाशित करत होतात; पण अनेक दिवसांपासून तुम्ही या भाषेत काहीही प्रकाशित केले नाही. येथे पुष्कळ लोक पर्शियन भाषा बोलतात. ते अध्यात्माच्या शोधात आहेत. अध्यात्माविषयी माहिती मिळवण्यासाठी आपले संकेतस्थळ पुष्कळ लाभदायी होईल !’ – श्री. अहमद शिरवान

१ आ. क्रोएशियन फेसबूक

१ आ १. ‘आपण हे कार्य निष्ठेनेे आणि प्रामाणिकपणे करत आहात ! : ‘या व्यावहारिक जगात आपण प्रत्येक जिज्ञासूला वेळ देऊन त्याच्या प्रश्‍नांना संयमाने उत्तरे देता, ते पाहून मी पुष्कळ प्रभावित झालो आहे.’ – श्री. अलेक्झांडर स्पासिच, क्रोएशिया

१ इ. पूर्व युरोपसाठीचे फेसबूक पेज

१ इ १. लोकांना साहाय्य करण्याची आपली तळमळ विलक्षण आहे ! : ‘मी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाला उपस्थित होते. मला हे व्याख्यान पुष्कळ आवडले. लोकांना साहाय्य करण्याची आपली तळमळ विलक्षण (असामान्य) आहे. त्यासाठी मी आपली कृतज्ञ आहे.’ – कु. मिलिका दुर्देव्हिच

२. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या फेसबूकला एप्रिल २०१९ मध्ये भेट देणार्‍या जिज्ञासूंचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

२ अ. साधनेमुळे अनेक प्रकारचे लाभ अनुभवता येणे : ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यापासून धूम्रपान करणे आणि माहितीजालावर खेळ (ऑनलाइन गेम) खेळणे ही माझी व्यसने बंद झाली आहेत. आता मला ‘झोपेत जखडल्यासारखे होऊन हालचाल करता न येणे (स्लीप पॅरॅलिसिस)’ हा त्रासही होत नाही. जीवनातील कठीण प्रसंग शांत आणि स्थिर राहून मला स्वीकारता येऊ लागले आहेत. कुटुंबियांकडून असलेल्या माझ्या अपेक्षाही आता न्यून झाल्या आहेत. मी ईश्‍वरचरणी कृतज्ञ आहे.’ – श्री. गी बिंग केल्विन टियर, सिंगापूर

३. एस्.एस्.आर्.एफ्. इन्स्टाग्राम

३ अ. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे तणावमुक्त आणि आनंदी वाटणे : ‘मी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ने आयोजित केलेल्या सत्संगांना उपस्थित असतो. मी सत्संगात स्वतःच्या स्वभावदोषांवर मात करण्यासाठी स्वयंसूचना घेण्यास शिकलो आहे. आता मी स्वयंसूचना घेण्यास आरंभ केला असून त्यामुळे मला तणावमुक्त, आरामदायी आणि पुष्कळ आनंदी वाटत आहे. मी माझ्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ‘स्वयंसूचनांमुळे स्वतःत होणारे सकारात्मक पालट प्रत्येकाने अनुभवायला हवेत’, असे मला वाटते. ‘स्वयंसूचना घेतल्यामुळे माझ्यातील स्वभावदोष ८० टक्के न्यून झाले आहेत’, असे मला वाटते. मी श्रीकृष्ण आणि मला आध्यात्मिक प्रगतीसाठी साहाय्य करणार्‍या ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे सदस्य यांचा कृतज्ञ आहे.’ – श्री. श्रीनिवास रावआंबेकर

४. एस्.एस्.आर्.एफ्. भारत ‘लॉग-इन’

अ. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाचे वाचन केल्यावर मला माझ्या पुष्कळ समस्यांची उत्तरे सापडली. हे वाचन माझ्या आध्यात्मिक प्रगतीलाही साहाय्यभूत झाले आहे. आपला ‘शंकानिरसन (आस्क अ क्वेश्‍चन) विभाग’ सर्वोत्तम आहे. ‘आपल्यावर ईश्‍वराची अखंड कृपा रहावी’, अशी प्रार्थना करतो.’ – श्री. डावू देव्हू, इडूकी, भारत.

आ. ‘मी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या मार्गदर्शनानुसार मीठ-पाण्याच्या उपायांना आरंभ केल्यावर मला होत असलेले भास न्यून झाले आहेत.’ – एक जिज्ञासू, चित्तूर, भारत.


Multi Language |Offline reading | PDF