क्रिकेट सामन्यात बलुचिस्तानी नागरिकांवर पाककडून होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणारा फलक झळकला

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळची घटना

बर्मिंगहम (ब्रिटन) – येथे चालू असलेल्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत ११ जुलै या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. त्या वेळी मैदानावरून जाणार्‍या विमानातून ‘जगाने बलुचिस्तानसाठी आवाज उठवला पाहिजे’, अशा आशयाचा फलक झळकावला गेला. पाकमधील बलुचिस्तान प्रांतातील नागरिकांवर पाक सैन्य अनन्वित अत्याचार करत आहे. त्यामुळे तेथील नागरिक स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर हा फलक झळकावला गेला. यापूर्वीही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या वेळीही असा फलक झळकवण्यात आला होता. यामुळे दोन्ही देशांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती. तसेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याच्या वेळी स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारा फलक झळकवण्यात आला होता. या सामन्याच्या वेळी ४ शिखांना स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले होते. या चौघांनी टी-शर्ट घातले होते आणि त्यावर खलिस्तानी चळवळीला पाठिंबा देणारा मजकूर लिहिला होता. (ब्रिटन हा खलिस्तानी आतंकवाद्यांच्या अड्डा बनत असल्याचे हे द्योतक आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF