गुरुजींनी सांगितलेले ऐकून त्यांची शक्ती वाढवून परमेश्‍वराच्या मार्गाकडे गती ठेवणे, हे त्यांच्या आध्यात्मिक कुटुंबाचे कर्तव्य असणे

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘युगपुरुषांच्या आदेशानुसार आमचे कार्य चालते, उदा. पूर्वपुण्याई असलेल्या संबंधित मंडळींना मार्गदर्शन करणे; भवितव्यातील संकटे, कर्मे आणि आपल्या कुटुंबियांच्या मार्गात असलेले इतर काटेकुटे उपायांनी बाजूला करून परमेश्‍वराच्या अंशात विलीन होण्याकरता कुटुंबियांची श्रद्धा वाढवून त्यांना मार्गस्थ करणे; त्यांस वेळोवेळी सावध करणे आणि उपाय सांगणे’, हा माझ्या तपश्‍चर्याशक्तीचा एक भाग आहे. अशा तर्‍हेचे कार्य करून माझी शक्ती ५० टक्के वाढते; परंतु त्याप्रमाणे या मंडळींनी आचरण करून आपले काटेकुटे बाजूला करण्यासाठी हातभार लावल्यास आणि तीही परमेश्‍वराच्या अंशाकडे येऊ लागल्यास माझी शक्ती ५० टक्के वाढते. मी जसा जाईन, तसे माझे कुटुंब परमेश्‍वरी शक्तीकडे चालून येईल. ही सारी शक्ती परमेश्‍वरात विलीन झाल्यास परमेश्‍वराची शक्ती वाढल्याने तो परमेश्‍वर पुन्हा तुमच्यावर कृपादृष्टी ठेवील. तुमच्या मार्गातील काटे उचलण्यात गुरुजींनी आपला वेळ घालवला आणि शक्ती खर्च केली, असे व्हायला नको. ते काटे बाजूला करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न केले पाहिजेत. नाहीतर त्यांच्या शक्तीचा र्‍हास आणि तुम्ही सांगितलेले न पाळल्यास ती सारी शक्ती वर जाण्याऐवजी खाली येते. तेव्हा मला तुमच्यासाठी शक्तीचा पुष्कळ र्‍हास करावा लागतो. मी माझ्या कुटुंबियांना विधात्याच्या गुढाची मानवापासून अंधकारात असलेली अनेक तत्त्वे, अनेक प्रश्‍न उघड करून दाखवले आहेत. ते त्याप्रमाणे चालल्यास ही तत्त्वे उघड करून सांगितल्याचा जो मार्ग आहे, त्याचा फायदा घेणे आणि त्याप्रमाणे वागून आपली अन् गुरुजींची शक्ती वाढवून परमेश्‍वराच्या मार्गाकडे गती ठेवणे, हे कुटुंबियांचे कर्तव्य आहे. ते तसे न वागल्यास  गुरुजींनी आजपर्यंत न सांगितलेली तत्त्वे गुप्त ठेवल्याने त्यांच्या शक्तीचा र्‍हास होत आहे.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून, ७.१.१९८१)


Multi Language |Offline reading | PDF