भारतीय संघाच्या पराभवानंतर काश्मीरमध्ये धर्मांधांचा जल्लोष !

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून पराभव

  • ‘मोठ्या प्रमाणात आतंकवादी ठार होत असल्याने काश्मीरची स्थिती सुधारली आहे’, असे कोणी म्हणत असेल, तर ते किती फोल आहे, हे या घटनेतून सिद्ध होते !
  • जोपर्यंत काश्मीरमध्ये अशा देशद्रोही मनोवृत्तीचे लोक असतील, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद आणि देशद्रोही कारवाया थांबणार नाहीत !

श्रीनगर – विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य सामना खेळला गेला. यात भारत पराभूत झाला. भारताच्या पराभवानंतर काश्मीर खोर्‍यात देशद्रोही धर्मांधांनी जल्लोष केला. श्रीनगर, पुलवामा, अनंतनाग, शोपियां आदी भागांत धर्मांध तरुणांकडून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले आणि भारतविरोधी अन् पाकच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. या घटनेचे ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. काही ठिकाणी या धर्मांध तरुणांनी सुरक्षादलांशी वादही घातला. सुरक्षादलांनी त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यावर धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी सैनिकांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

न्यूझीलंड संघाला पाकच्या मेजर जनरलकडून शुभेच्छा !

भारतावर सतत कुरघोडी करणार्‍या पाकला कायमची अद्दल घडवल्याविना त्याच्या कुरापती थांबणार नाहीत !

इस्लामाबाद – न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा पराभव केला. यानंतर पाकच्या सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ‘ट्वीट’ करत न्यूझीलंड संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. असे करून त्यांनी भारताला जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

१. या ‘ट्वीट’मध्ये त्यांनी म्हटले आहे, ‘क्रिकेट विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या न्यूझीलंडच्या संघाला विजयाच्या शुभेच्छा.

न्यूझीलंडने खेळभावना दाखवली आणि एका महान देशाने नैतिक मूल्यांच्या आधारे सामना खेळला.’

२. मेजर जनरल गफूर यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताचा पराभव झाल्यावरही ‘ट्वीट’ केले होते. यात त्यांनी म्हटले होते, ‘इंग्लंडविरुद्ध खेळतांना भारताकडे नैतिक मूल्यांची कमतरता दिसून आली.’

३. या सामन्यात भारताचा पराभव झाल्याने पाकिस्तानी संघाचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले होते. ‘इंग्लंडच्या विरोधात खेळतांना भारत जाणीवपूर्वक पराभूत झाला’, असे त्यांना यातून दाखवायचे होते. त्यामुळेच त्यांनी आता ‘ट्वीट’ करतांना न्यूझीलंडला ‘नैतिक मूल्यांच्या आधारे सामना खेळला’, असे म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF