‘मुलींची साधना व्हावी’, यासाठी धडपडणार्‍या आणि आध्यात्मिक त्रासावर मात करून तळमळीने साधना करणार्‍या सौ. वैशाली मुद्गल !

सौ. वैशाली मुद्गल यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

आषाढ शुक्ल पक्ष एकादशी (१२.७.२०१९) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या सौ. वैशाली मुद्गल यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. अमृता हिला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. वैशाली मुद्गल

१. वडिलांचे प्रेम देणे

‘सर्वसाधारणपणे मुलींना वडील जवळचे वाटतात. मला आईने वडिलांचेही प्रेम दिले. आमच्या घरी आमच्या साधनेसाठी विरोध होता. आई कुटुंबियांकडून होणार्‍या विरोधाला खंबीरपणे सामोरे गेली. केवळ आईमुळेच मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला पूर्णवेळ साधना करता येत आहेे.

कु. अमृता मुद्गल

२. मुलींना आनंद मिळावा, यासाठी धडपडणे

अ. आईला कोणी काही खाऊ किंवा अन्य काही दिले, तर ती ते पहिल्यांदा आम्हाला देते. त्यानंतर ती स्वतः खाते.

आ. सणासुदीला ती स्वतः फारसे अलंकार घालत नाही; पण ती आम्हा दोघींना नटवते. तिला वाटते, ‘तिच्या मुली चांगल्या दिसल्या पाहिजेत.’ ‘मुलींना काहीच अल्प पडू द्यायचे नाही’, असे माझ्या आईला सतत वाटत असते. त्यामुळे ती स्वतःसाठी फार काही न घेता आम्हाला देत असते.’

इ. आईला पहाटे ३ – ४ वाजता झोप लागते, तरी ती सकाळी उठून नामजप, वैयक्तिक आवरणे आदी सर्व वेळेत करून आम्हाला साहाय्य करते. मी सेवेत व्यस्त असल्यास ती माझे कपडे धुते आणि इस्त्री करून खणात ठेवते.

३. साधनेची तळमळ

अ. आई कुटुंबियांचा विरोध पत्करून पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात रहाते.

आ. सध्या आईला होणार्‍या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली आहे. ती नियमित नामजपादी उपाय करून त्रासावर मात करण्याचा प्रयत्न करते. ती परिश्रम घेऊन मन लावून साधना करते. ती श्रीकृष्णाशी सूक्ष्मातून बोलते आणि सतत भावावस्थेत अन् आनंदी रहाण्याचा प्रयत्न करते.

४. भाव

आईमध्ये श्रीकृष्णाप्रती भाव आहे. ती कधी कधी सुंदर भावप्रयोग सांगते. तिने सांगितल्याप्रमाणे भावप्रयोग केल्यावर मला चांगले वाटून आनंद मिळतो.

५. ‘आई’ हे देवाचे रूप !

‘आई’ या शब्दातच एवढे वात्सल्य आहे की, तीच माझ्या आयुष्यातील मोठा आनंद आहे.’ माझ्या आईने मला पुष्कळ काही दिले आहे. मी ते शब्दांत सांगू शकत नाही. मी तिच्याप्रती केवळ कृतज्ञताच व्यक्त करू शकते. ‘आई’ ही मुलांच्या जीवनातील प्रथम गुरु असते; म्हणूनच ‘मातृदेवो भव !’ असे म्हणतात. आई लेकरासाठी देव असते.

देवा, प्रत्येक बाळासाठी तू आई देतोस; पण तू मला अशी वात्सल्यमूर्ती आई दिली आहेस की, त्यासाठी मी तुझ्या आणि आईच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’

– केवळ देवबाप्पाचे लेकरू,

कु. अमृता मुद्गल (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF