१८ जुलैपर्यंत मध्यस्थांच्या अहवालाची वाट पाहू अन्यथा २५ जुलैपासून सुनावणी करू ! – सर्वोच्च न्यायालय

रामजन्मभूमी प्रकरण

नवी देहली – रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आम्ही मध्यस्थांची समिती नेमली आहे. या समितीने तिचा अहवाल सादर करावा. त्यासाठी आम्ही १८ जुलैपर्यंत वाट पाहू अन्यथा २५ जुलैपासून प्रतिदिन सुनावणीला प्रारंभ करू, असे सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलै या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी सांगितले. याचिकाकर्ते गोपालसिंह विशारद यांनी केलेल्या याचिकेवर ही सुनावणी झाली. गोपाल सिंह यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, ‘मध्यस्थ नेमण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता; मात्र मध्यस्थांच्या समितीकडून या प्रश्‍नावर जो तोडगा काढला होता, त्याने कुणाचेही समाधान झालेले नाही.’

 


Multi Language |Offline reading | PDF