भारताची पुन्हा एकदा वर्ष १९४७ प्रमाणे सांस्कृतिक फाळणीच्या दिशेने वाटचाल ! – केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

धार्मिक कारणांमुळे भारतात लोकसंख्या नियंत्रण कायद्यात अडचणी

  • भारताची लोकसंख्येच्या आधारावर दुसरी फाळणी होण्यापूर्वीच देशात समान नागरी कायदा लागू करा !
  • धर्मांधांच्या ‘आम्ही ५ आणि आमचे २५’ या धोरणामुळेच देश रसातळाला जात आहे’, हे सरकारी बाबूंच्या कधीही लक्षात येणार नाही ! आता समान नागरी कायदा होण्यासाठी हिंदूंनीच सरकारकडे मागणी करावी !

नवी देहली – भारतामध्ये लोकसंख्येचा स्फोट हा अर्थव्यवस्था, सामाजिक समरसता आणि साधन यांचे संतुलन बिघडवत आहे. लोकसंख्येला नियंत्रणात ठेवण्यामध्ये धार्मिक अडचण आहे. भारत पुन्हा एकदा वर्ष १९४७ च्या सांस्कृतिक फाळणीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता सर्व राजकीय पक्षांनी लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ११ जुलै या दिवशी असलेल्या ‘जागतिक लोकसंख्या दिना’निमित्त ट्वीट करत केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF