भक्ती, ज्ञान, ज्ञानाची परानिष्ठा, पराभक्ती आणि ब्रह्मरूपत्व

 ॥ श्रीकृष्णाय नम:॥

श्री. अनंत आठवले

२. ज्ञान

२ आ. ज्ञान कसे प्राप्त होते ?

२ आ ४. चित्तशुद्धीने ज्ञानप्राप्ती

भगवान् श्रीकृष्ण सांगतात,

‘इहलोकात ज्ञानासारखे पवित्र करणारे दुसरे काहीही नाही. ते ज्ञान योगाने (समत्वबुद्धीयोग, कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इ. कोणत्याही योगाने) काही काळानंतर (म्हणजे योगात स्थिर झाल्यावर) चित्तशुद्धी झालेला मनुष्य आपल्या आत्म्यातच प्राप्त करतो. ’ (संदर्भ – गीता अ. ४, श्‍लोक ३८)

ह्याने एक गोष्ट स्पष्ट होते की, ‘आत्मज्ञान होण्यासाठी गुरु हवेत किंवा ग्रंथांचा अभ्यास केलाच पाहिजे’, असे नाही. शुद्ध चित्तात ज्ञानाचा स्वच्छ प्रकाश आपोआप पडतो.

२ आ ५. पराभक्तीने ज्ञानप्राप्ती : हा विषय पुढे आला आहे.

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

– अनंत आठवले (२०.५.२०१९)        (क्रमशः)

(‘या लिखाणातील चैतन्य कमी होऊ नये; म्हणून लेखक पू. अनंत आठवले यांनी दिलेला लेख जसाच्या तसा छापला आहे. ‘आत्मज्ञान आणि निष्कामतेचे महत्त्व’, ह्या लिखाणावरून लक्षात येईल.’ – संकलक)


Multi Language |Offline reading | PDF