पाकमध्ये अजूनही भारताचे ८३ युद्धकैदी ! – केंद्र सरकारची माहिती

नवी देहली – केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार अजूनही ८३ भारतीय सैनिक पाकमध्ये युद्धकैदी आहेत. भारताने या सैनिकांच्या सुटकेसाठी परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून बरेच प्रयत्न केले; परंतु ‘भारतीय सैनिक अटकेत आहेत’, हेच पाकने स्वीकारलेले नाही, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी लोकसभेत दिली. याविषयी खासदार गोपाल चिनैय्या यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता.

मुरलीधर यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, ६४ भारतीय नागरिक आणि २०९ भारतीय मच्छीमार पाकच्या कह्यात आहेत. १ जुलै या दिवशी पाकने मान्य केले की, ५२ भारतीय नागरिक आणि २०९ मच्छीमार त्यांच्या कह्यात आहेत. वर्ष २०१४ पासून आतापर्यंत २ सहस्र ११० भारतीय कैद्यांना पाकच्या कह्यातून सोडवण्यात आलेले आहे.


Multi Language |Offline reading | PDF