वाढत्या राष्ट्रविरोधी जिहादी कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा ! – विहिंपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोल्हापूर, ११ जुलै (वार्ता.) – देशात विविध ठिकाणी फुटीरतावादी मानसिकतेमधून विविध संघटनांद्वारे अनेक राष्ट्रविरोधी  कारवाया चालू आहेत. या कारवाया समूळ नष्ट करून त्यांच्यावर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने ९ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी श्री. दौलत देसाई यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, ‘जय श्रीराम’ या स्फूर्ती देणार्‍या पवित्र मंत्राची विविध राज्यात मुख्यत्वाने पश्‍चिम बंगालमध्ये होत असलेली अवहेलना थांबवावी, अन्यथा भविष्यात व्यापक आंदोलन छेडण्यात येईल. अधिवक्ता रणजितसिंह घाडगे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनप्रसंगी करवीरप्रमुख श्री. शहाजी कारंडे, श्री. अजित कांबळे, ऋतुजा जमदाडे, अपर्णा वाघमारे, सर्वश्री संतोष सारंग, मालोजी केरकर, संदीप चौगुले उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF