काँग्रेसकडून डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या विरोधात ३९ गुन्हे नोंद

जयपूर (राजस्थान) – काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या विरोधात राजस्थानात २० याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. या याचिकेनंतर युवक काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत ३९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ‘राहुल गांधी अमली पदार्थाचे सेवन करतात’, असे विधान डॉ. स्वामी यांनी केले होते. या विधानानंतर वरील याचिका आणि गुन्हे नोंदवण्यात आले. ‘डॉ. स्वामी यांनी या वक्तव्याप्रकरणी जाहीररित्या क्षमा मागावी’, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF