लोकसंख्यावाढ हेच देशातील समस्यांमागील एकमेव कारण नाही !

११ जुलै या दिवशी असलेल्या ‘जागतिक लोकसंख्यादिना’च्या निमित्ताने…

‘देशातील वाढत्या समस्यांचे मूळ कारण देशाच्या लोकसंख्येत होणारी वाढ आहे’, असा टाहो काही बुद्धीवादी फोडत असतात. प्रत्यक्षात देशातील समस्यांना केवळ लोकसंख्यावाढ हेच नाही, तर देशातील भ्रष्टाचार तितकाच कारणीभूत आहेत. स्वदेशी आंदोलनाचे प्रणेते कै. राजीव दीक्षित यांनी याविषयी मांडलेले अभ्यासपूर्ण विचार आज असलेल्या ‘जागतिक लोकसंख्यादिना’निमित्त देत आहोत.

१. भारताची लोकसंख्या आणि अन्नधान्याचे उत्पादन यांच्या वाढीचे समीकरण !

२. अन्य राष्ट्रांची लोकसंख्या आणि अन्नधान्याचे उत्पादन यांच्या वाढीचे समीकरण !

३. लोकसंख्या वाढीमुळे दारिद्य्र, निरोद्योगीपणा आदी नाही, तर उत्पादन वाढते, हे सिद्ध करणारा चीन !

जगातील सर्वच देशांची लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढीमुळे दारिद्य्र, निरोद्योगीपणा आदी वाढत नाही, तर उत्पादन वाढते, हे चीनने सिद्ध करून दाखवले. चीन कधीही आपल्या देशातील लोकांना अभिशाप मानत नाही. लोकसंख्यावाढीचा आणि दारिद्य्र अन् निरोद्योगीपणा वाढण्याचा काहीएक संबंध नाही.

४. माणूस जेवढे खातो, त्याच्या १० पट पिकवतो, हे लक्षात घ्या !

समजा एक व्यक्ती जन्मानंतर वयाच्या ८० वर्षांपर्यंत अधिकाधिक ३ ते ४ सहस्र टन अन्न खाते; पण ५ एकर शेतात ८० वर्षांपर्यंत ती राबली, तर ३० सहस्र टन अन्न निर्माण करते. मानव असा प्राणी आहे, जो खातो अल्प; पण पिकवतो १० पट.

५. देशाचे उत्पादन वाढवण्यासाठी लोकसंख्या वाढवणे आवश्यक असल्याचे सांगणारा ‘डेन्मार्क’ !

‘लोकसंख्यावाढीमुळे दारिद्य्र आणि निरोद्योगीपणा वाढतो’, हा सिद्धांत विदेशी लोकांना अमान्य आहे; पण भारताने मात्र तो उचलून धरला आहे. डेन्मार्कमध्ये एका चर्चासत्रासाठी मी (राजीव दीक्षित) गेलो होतो. तिथले प्रशासन लोकसंख्या वाढीसाठी प्रोत्साहन देते, असे मला दिसले. तिथे ‘मुले जितकी अधिक, तेवढे अधिकारीपद उच्च’, असा नियम आहे. त्या वेळी मला तेथील एका सहकार्‍याने सांगितले,

‘‘आमच्या देशात काम अधिक आहे आणि लोकसंख्या न्यून आहे. त्यामुळे देशाचे उत्पादन वाढवण्यासाठी लोकसंख्या वाढवणे आवश्यक आहे.’’

६. देशातील दारिद्य्र आणि निरोद्योगीपणा वाढत आहे, याला कारण लोकसंख्या नव्हे, तर (तत्कालीन) भ्रष्टाचारी शासनकर्तेच आहेत, हे आजही सिद्ध होते. आज भारताच्या या समस्यांना अनेक (तत्कालीन) भारतीय भ्रष्ट नेते उत्तरदायी आहेत.

– कै. राजीव दीक्षित, स्वदेशी आंदोलनाचे प्रणेते (वर्ष २००४)

(वरील विचार हे आजपासून १५ वर्षांपूर्वी मांडले असून आजही या परिस्थितीत विशेष पालट झालेला नाही. यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होऊन

भ्रष्टाचाराच्या विरोधात संघटितपणे कृती होणे आवश्यक आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF