दाऊदच्या टोळीचे आतंकवादी टोळीत रूपांतर होणे, ही भारतासाठी डोकेदुखी ! – भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत माहिती

न्यूयॉर्क – मुंबईत वर्ष १९९२ मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणारा दाऊद इब्राहिम याच्या ‘डी-कंपनी’ या गुन्हेगारी टोळीचे आतंकवादी टोळीत रूपांतर झाले आहे. या टोळीचे आतंकवादी जाळे (नेटवर्क) सर्वत्र पसरले आहे. भारतासाठी ही डोकेदुखी आहे, अशी माहिती भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये दिली. ‘आज आमच्या क्षेत्रामध्ये खरा आणि सर्वांत मोठा धोका हाच आहे’, असेही ते म्हणाले.


Multi Language |Offline reading | PDF