नेपाळने दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करण्याची अनुमती नाकारली

चीनच्या दबावाचा परिणाम !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळ सरकारने चीनच्या दबावामुळे तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुुरु दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करण्याची अनुमती नाकारली. त्यामुळे ७ जुलै या दिवशी येथे होणारा कार्यक्रम रहित करण्यात आला. नेपाळमध्ये २० सहस्र तिबेटी शरणार्थी रहातात. नेपाळ सरकार या शरणार्थींविषयी कठोर धोरण राबवत आहे.


Multi Language |Offline reading | PDF