पाकिस्तानमध्ये अपहरण करण्यात येणार्‍या हिंदु मुलींना न्याय मिळण्यासाठी कॅनडामध्ये आंदोलन

कॅनडामध्ये पाकमधील हिंदु मुलींना न्याय मिळण्यासाठी आंदोलन करण्यात येते; मात्र भारतात काहीही केले जात नाही !

ओटावा (कॅनडा) – कॅनडामधील मिसिसौगा सेलिब्रेशन चौकामध्ये मूळ पाकिस्तानातील सिंध प्रांतात रहाणारे; मात्र सध्या कॅनडात वास्तव्य करणार्‍या हिंदूंनी पाकच्या विरोधात निदर्शने केली. पाकमध्ये अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून होणार्‍या धर्मांतराविषयी त्यांनी हे आंदोलन केले. त्यांनी ‘पाकमधील हिंदूंना न्याय देण्यात यावा’, अशी मागणी केली.


Multi Language |Offline reading | PDF