इस्रायलमधील आस्थापनाने मद्याच्या बाटलीवर छापले मोहनदास गांधी यांचे छायाचित्र

भारत सरकारच्या आक्षेपानंतर क्षमायाचना

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत, धर्मप्रतीके अणि राष्ट्रपुरुष यांच्या संदर्भात असे विडंबन झाल्यानंतर सरकारने अशीच तंबी संबंधितांना द्यावी, म्हणजे हिंदु धर्माचे विडंबन कोणी करू धजावणार नाही !

जेरूसलेम (इस्रायल) – इस्रायलच्या ७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील ताफेन औद्योगिक क्षेत्रातील ‘माका ब्रेवरी’ या आस्थापनाने मद्याच्या बाटलीवर मोहनदास गांधी यांचे छायाचित्र छापले. यावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला. सामाजिक प्रसारमाध्यमांतूनही या आस्थापनावर बरीच टीका झाली. यानंतर या आस्थापनाने भारतियांची क्षमायाचना करत हे चित्र काढून टाकले.


Multi Language |Offline reading | PDF