कराची येथील भारताच्या बंद असलेल्या दूतावासाच्या आवारात अतिक्रमण

कराची (पाकिस्तान) – मुंबईतील वर्ष १९९३ च्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर बंद करण्यात आलेल्या येथील भारतीय दूतावासाच्या आवारात अतिक्रमण करण्यात आले आहे. याविषयी भारताने पाकिस्तानकडे तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला असून पाकचे भारतातील उपउच्चायुक्त हैदर शहा यांना समन्स बजावले आहे. दूतावासाची ६ मजली इमारत पूर्णत: बंद असून केवळ सुरक्षारक्षक आणि त्यांची कुटुंबे तेथे रहातात. सध्या येथे समाजकटंकांनी अवैधरित्या बांधकाम केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF