व्याजासहित ७ सहस्र ३०० कोटी रुपये पंजाब नॅशनल बँकेला चुकते करावेत !

विदेशात पसार झालेले कर्जबुडवे नीरव मोदी यांना कर्जवसुली प्राधिकरणाचा आदेश

पुणे – पंजाब नॅशनल बँकेची (पीएन्बीची) फसवणूक करून देशातून पळून गेलेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांना पुण्यातील कर्जवसुली प्राधिकरणाने (डीआर्टीने) ‘व्याजासहित ७ सहस्र ३०० कोटी रुपये बँकेला चुकते करावेत’, असा आदेश दिला आहे. यापूर्वी सिंगापूरच्या उच्च न्यायालयानेही ब्रिटनमध्ये नीरव मोदी यांच्या नोंदणीकृत असलेल्या आस्थापनाचे बँक खाते गोठवण्याचे आदेश दिले होते. या खात्यात त्यांचे ४४ कोटी ४१ लाख रुपये आहेत. या खात्याचे लाभार्थी नीरव मोदी यांची बहीण पूर्वी मोदी आणि मेहुणे मयांक मेहता हे आहेत. निर्णय देतांना न्यायालयाने सांगितले होते की, या खात्यातील पैसा हा गुन्ह्यातील पैसा आहे. यामध्ये पीएन्बी घोटाळ्यातील रक्कम अवैध पद्धतीने पाठवण्यात आली आहे.

स्वित्झर्लंडच्या प्रशासनानेही २७ जूनला नीरव मोदी आणि त्यांची बहीण यांचे स्विस बँकेच्या चार खात्यांमधून होणारे व्यवहार रोखले होते. सध्या या खात्यांमध्ये २८३ कोटी १६ लाख रुपये जमा आहेत.


Multi Language |Offline reading | PDF