मुंबईमध्ये पाणी साठले त्या वेळी तुम्ही कुठे होतात ? – राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारले

पक्ष वाढण्यासाठी नव्हे, तर समाजहितासाठी काम करणारे नेते हवेत ! लोकांसाठी काही कारायला हवे, हे काँग्रेसनेत्यांना माहीत आहे कुठे ? केवळ स्वतःची खळगी भरण्याचा कुसंस्कार गेली अनेक वर्षे त्यांच्यावर झाला आहे !

मुंबई – लोकांना साहाय्य करणे आपले काम आहे. पक्ष वाढवायचा असल्यास लोकांच्या साहाय्याला रस्त्यावर उतरले पाहिजे, जर तुम्ही त्यांना साहाय्य केले नाही, तर पक्ष कसा वाढेल ? मुंबईकरांना साहाय्य करण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरायला हवे होते. सर्वसामान्य लोकांना साहाय्याचा हात द्यायला हवा होता. मुंबईमध्ये पाणी साठले, त्या वेळी लोकांना साहाय्याची आवश्यकता होती. त्या वेळी तुम्ही कुठे होतात ? अशा शब्दांत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फटकारले. ४ जुलै या दिवशी शिवडी येथील न्यायालयात खटल्याच्या सुनावणीसाठी आले असतांना त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संवाद साधला. या वेळी काँग्रेसचे मुंबई येथील नेते उपस्थित होते.

 


Multi Language |Offline reading | PDF