राहुल गांधी यांना जामीन संमत

गौरी लंकेश हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप केल्याचे प्रकरण

मुंबई – गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रूहानीचा खटला प्रविष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल गांधी हे ४ जुलै या दिवशी शिवडी जिल्हा सत्र न्यायालयात उपस्थित राहिले. न्यायालयाने त्यांची १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. सुनावणीच्या वेळी राहुल गांधी यांनी ‘मी दोषी नाही’, असे वक्तव्य केले. या वेळी काँग्रेसचे नेतेहीे उपस्थित होते. या प्रकरणी माकपचे नेते सीताराम येच्युरी यांच्या विरोधातही न्यायालयाने समन्स काढला आहे.


Multi Language |Offline reading | PDF