(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपावर मी ठाम आहे !’ –  राहुल गांधी

‘सुंभ जळाला, तरी पीळ जात नाही’, अशा वृत्तीचे राहुल गांधी ! तथ्यहीन आरोप करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच जनतेने सत्तेवरून खाली खेचले आणि देशभरात दारुण पराभव झाला, तरीही काँग्रेसचे राहुल गांधी यांना अजून शहाणपण आले नाही, असेच म्हणावे लागेल !

मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपावर मी ठाम आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ४ जुलै या दिवशी केले. गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केल्याच्या प्रकरणी स्वत:वर प्रविष्ट झालेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी हे येथील शिवडी जिल्हा सत्र न्यायालयात आले होते. या वेळी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील केलेल्या आरोपाचे समर्थन केले.

या वेळी राहुल गांधी म्हणाले की, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, तरुणांचे प्रश्‍न यांच्या विरोधात माझी लढाई चालूच रहाणार आहे. मागील ५ वर्षांमध्ये ज्या ताकदीने लढलो, त्याच्या १० पट ताकदीने पुढची लढाई चालू राहील. माझी लढाई ही विचारांची लढाई आहे. ही लढाई मी यापुढेही लढत रहाणार आणि अधिक तीव्र करणार आहे. (सर्वाधिक काळ सत्ता भोगूनही जनतेचे प्रश्‍न सोडवू न शकणार्‍या उलट भ्रष्टाचार करून जनतेलाच लुटणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांवर आता कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF