भारताला ‘नाटो’ देशांच्या समान दर्जा देणारे विधेयक अमेरिकेच्या संसदेत संमत

वॉशिंग्टन – भारताला ‘नाटो’ (फ्रान्स, बेल्जियम, लक्झमबर्ग, ब्रिटेन, नेदरलॅण्ड, कॅनडा, डेन्मार्क, आइसलॅण्ड, इटली, नार्वे, पोर्तुगाल आणि संयुक्त राज्य अमेरिका) देशांच्या समान दर्जा देणारे विधेयक अमेरिकेच्या संसदेने संमत केले आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्राशी निगडित व्यवहारांमध्ये अमेरिका भारतासमवेत त्याचे ‘नाटो’चे सहकारी देश इस्त्रायल आणि दक्षिण कोरिया यांच्याप्रमाणे व्यवहार करेल. भारत अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील मोठा भागीदार असल्याचे अमेरिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते. तसेच भारताला आता नाटो देशांच्या समान दर्जा मिळाल्यामुळे भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशी संरक्षण सामग्री खरेदी करू शकणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF