गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी गायन सेवा सादर करणार्‍या दोन साधिकांपैकी एकीचे डोळे बंद असणे आणि दुसर्‍या साधिकेचे डोळे उघडे असणे यांमागील शास्त्र !

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा ७७ व्या जन्मोत्सवाच्या वेळी अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांनी गायनाच्या माध्यमातून स्वरांजली अर्पण केली. तेव्हा कु. तेजल पात्रीकर यांचे डोळे बंद होते आणि सौ. अनघा जोशी यांचे डोळे उघडे होते. त्यामागील आध्यात्मिक कारण पुढील प्रमाणे आहे.

गायन सेवा सादर करतांना डावीकडून सौ. अनघा जोशी आणि कु. तेजल पात्रीकर

१. कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी या दोघी गायन सेवा सादर करत असतांना त्यांच्याविषयी जाणवलेली सामाईक सूत्रे

अ. दोघीही भावावस्थेत गायन करत होत्या.

आ. दोघींच्याही कंठामध्ये साक्षात माता सरस्वतीचे सूक्ष्म रूप विराजमान होते. त्यामुळे दोघींच्या माध्यमातून साक्षात सरस्वतीदेवीनेच गायनसेवा केली.

इ. दोघींचे स्वर एकमेकींच्या स्वरांशी एकरूप झाल्यामुळे ऐकतांना दोन आवाज ऐकू न येता एकच आवाज ऐकू येत होता. जेव्हा दोन गायकांची मने जुळतात, तेव्हाच त्यांचे स्वर एकमेकांशी पूर्णपणे एकरूप होतात.

ई. जेव्हा गायक गीताचा भावार्थ आणि स्वरांतील नाद यांच्याशी एकरूप होतो, तेव्हा त्याचे डोळे आपोआप बंद होतात किंवा उघडे रहातात अन् त्याच्या हातांची हालचाल नकळत होते.

२. गातांना डोळे उघडे असणे आणि बंद असणे यांतील भेद

३. साधक गायकांच्या गायनाचा दीर्घकाळ टिकणारा परिणाम !

साधना न करणार्‍या गायकांच्या गायनाचा परिणाम श्रोत्यांवर अल्प काळ टिकतो आणि तो वरवरचा असतो, तर साधना करणार्‍या गायकांच्या गायनाचा परिणाम दीर्घकाळ टिकतो आणि तो आध्यात्मिक स्तरावरील असतो.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.५.२०१९, रात्री १०.४०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.


Multi Language |Offline reading | PDF