श्री गुरूंच्या साथीने उजळो आध्यात्मिक जीवन सारे ।

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

कु. साईवर्धन नेला

परात्पर गुरु डॉक्टर,
घरी असतांना मला नव्हती ।
कुणाची सावली ।
आश्रमात आल्यावर मला लाभली ।
तुमच्यासारखी गुरुमाऊली ॥ १ ॥

घरी असतांना मला नव्हती ।
साधनेची ओढ ॥

आश्रमात आल्यावर ।
गुरुसेवेमुळे आनंद मिळू लागले गोड-गोड ॥ २ ॥

निळ्या आकाशी ।
शोभती चंद्र अन् तारे ॥

श्री गुरूंच्या साथीने उजळो ।
आध्यात्मिक जीवन सारे ॥ ३ ॥

आता माझी एकच इच्छा आहे देवा ।
माझी प्रत्येक कृती अन् प्रत्येक श्‍वास ।
तुमच्या चरणी अर्पण व्हावा ॥ ४ ॥

– श्री गुरुचरणसेवक,

कु. साईवर्धन नेला (वय १२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०१९)

‘कु. साईवर्धन नेला (वय १२ वर्षे) हा आंध्रप्रदेश येथील आहे. त्याची मातृभाषा मराठी नसूनही त्याने मराठी भाषा शिकून घेतली आणि मराठी भाषेत कविता केली, हे कौतुकास्पद आहे.’

– सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF