गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या ठिकाणी लावण्याच्या प्रदर्शनातील फलकांची सूची आणि त्यांच्या कलाकृती उपलब्ध !

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी येणार्‍या जिज्ञासूंना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने एकूण ३८ फ्लेक्स फलक उपलब्ध करण्यात येत आहेत. या फलकांमध्ये साधना, धर्मशिक्षण, सनातनची ग्रंथसंपदा, ‘सनातन प्रभात’, सनातनची उत्पादने, धर्मजागृती, हिंदु राष्ट्र आदींविषयी माहिती देण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमस्थळी उपलब्ध जागेनुसार आणि फलकांच्या सूचीतील प्राधान्यक्रमानुसार फलकप्रदर्शन लावता येईल.

प्रदर्शनात लावायच्या फलकांची सूची (एक्सेल धारिका) नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. सभागृहाच्या आकारमानानुसार फलक निवडणे सुलभ व्हावे, या हेतूने वरील सूची मोठ्या, मध्यम आणि लहान या तीन प्रकारांत बनवली आहे. जिल्हासेवकांनी आपल्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार फलक छापून घ्यावेत आणि या फलकांचे प्रदर्शन गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या ठिकाणी लावावे.

टीप : सूचीतील फलकांपैकी काही फलक जिल्ह्यात पूर्वी छापलेले असल्यास फलक वेगळे छपाई न करता उपलब्ध फलकांचा प्राधान्याने वापर करावा.


Multi Language |Offline reading | PDF