नीरव मोदी यांची २८३ कोटी रुपये जमा असलेली परदेशातील बँक खाती गोठवली

‘घोटाळेबहाद्दर नीरव मोदी यांची कितीही बँक खाती गोठवली, तरी त्यांना भारतात आणून त्यांनी लुटलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम जोपर्यंत वसूल केली जात नाही, तोपर्यंत भारत सरकारने स्वस्थ बसू नये’, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

नवी देहली – पंजाब नॅशनल बँकेचा १३ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्यांची बहीण यांची स्वित्झर्लंड येथील ४ बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये २८३ कोटी १६ लाख रुपये जमा हेते. ही संपूर्ण रक्कम गोठवण्यात आली आहे. स्विस बँकेने याविषयीचे एक निवेदन प्रसारित केले आहे आणि त्यात ‘भारताच्या मागणीनंतर ही बँक खाती गोठवण्यात आली’, असे म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF