३५० हून अधिक धर्मांधांच्या आक्रमणात गोरक्षक चेतन शर्मा गंभीररित्या घायाळ

जमावाने केलेल्या हत्यांविषयी (मॉब लिंचिंगविषयी) आवाज उठवणारे पुरो(अधो)गामी आणि हिंदुद्वेषी राजकारणी हे धर्मांधांच्या जमावाकडून गोरक्षकावर झालेल्या आक्रमणाविषयी आता गप्प का ? कि ‘गोरक्षकांना मानवाधिकार नाहीत’, असे त्यांना वाटते ? हिंदूंनो, तुमचे रक्षण होण्यासाठी आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही, हे जाणा !

घायाळ झालेले गोरक्षक श्री. चेतन शर्मा

ठाणे, २६ जून (वार्ता.) – बदलापूर येथील अवैध पशूवधगृहात गोहत्या केली जात असल्याचे प्रकरण अनेक मासांपासून चर्चेत आहे. अवैध पशूवधगृहात कापल्या जाणार्‍या गायींना पोलिसांच्या साहाय्याने वाचवण्याचा प्रयत्न करणारे गोरक्षक श्री. चेतन शर्मा यांच्यावर ३५० हून अधिक धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. यामध्ये शर्मा हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर डोंबिवली येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी मारहाण करणार्‍या अज्ञात आक्रमणकर्त्यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम १४७, १४३, १४९ आणि ३५३ नुसार गुन्हा नोंद केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

१. बदलापूर येथील अवैध पशूवधगृहांच्या विरोधात प्राणीमित्र, गोसेवक आणि विविध संघटनांनी वेळोवेळी भूमिका घेतली; परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नव्हती.

२. अखेर २४ जूनच्या मध्यरात्री या अवैध पशूवधगृहाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी श्री. चेतन शर्मा यांच्यासह ३५ ते ४५ पोलीस गेले होते; परंतु श्री. चेतन शर्मा आणि पोलीस पशूवधगृहाकडे येत असल्याचे समजताच ३५० हून अधिक धर्मांध अन् कसाई  एकत्र आले आणि त्यांनी श्री. शर्मा अन् त्यांच्या समवेत असलेल्यांवर ‘अल्ला-हु-अकबर’च्या घोषणा देत आक्रमण केले. (यातून धर्मांधांना पोलिसांचेही भय राहिलेले नाही, हे लक्षात येते ! हिंदूंचे रक्षण करू न शकणारे पोलीस काय कामाचे ? यातून हिंदूसंघटनाची आवश्यकता लक्षात येते ! – संपादक)

३. याच वेळी कसायांपैकी काहींनी श्री. शर्मा यांना लोखंडी सळईने मारहाण करायला प्रारंभ केला. या आक्रमणात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. शर्मा यांनी स्वरक्षणासाठी असलेल्या त्यांच्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला असता, काही प्रमाणात कसाई मागे फिरले. हे लक्षात येताच पोलिसांनीही घायाळ अवस्थेतील शर्मा यांना आपल्या गाडीत बसवले; पण गाडी पुढे नेताच कसाई पुन्हा चाल करून आले.

४. धर्मांधांनी पोलिसांच्या गाडीची चावी काढली आणि पुन्हा आक्रमण करू लागले. नंतर पोलिसांनी कशीबशी त्यातून स्वतःची सुटका करून घेत गाडी पुढे नेली; परंतु कसायांनी त्या गाडीचाही २५ ते ३० कि.मी. पर्यंत पाठलाग केला. धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात पोलिसांच्या वाहनाच्या काचा फुटल्या, तसेच श्री. शर्मा यांचा बचाव करतांना पोलिसांनाही किरकोळ दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

५. श्री. शर्मा यांना घेऊन बदलापूर पूर्व येथील पोलीस ठाण्याजवळ पोलीस आले असता तेथे ४० ते ५० धर्मांधांचा जमाव दिसल्याने परिस्थिती चिघळू नये म्हणून त्यांना पुन्हा अंबरनाथ पोलीस ठाण्यात नेऊन रुग्णालयात नेण्यात आले.

६. श्री. चेतन शर्मा यांच्यावर झालेल्या जीवघेण्या आक्रमणाचा निषेध म्हणून २५ जून या दिवशी ‘पीपल फॉर अ‍ॅनिमल्स’ संघटनेसह अन्यही अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या वेळी त्यांनी कसायांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.


Multi Language |Offline reading | PDF