हावडा (बंगाल) येथे रस्त्यांवर अवैधरित्या होणार्‍या नमाजपठणाला विरोध करण्यासाठी भाजपकडून रस्त्यावर हनुमान चालीसाचे पठण

  • धर्मांधांचा उद्दामपणा रोखला नाही, तर भविष्यात हिंदू प्रत्येक राज्यांत, शहरांत आणि गावागावांत रस्त्यावर उतरून अशा प्रकारे कृती करतील !
  • धर्मांधांच्या प्रत्येक कायदाद्रोही कृत्याला प्रोत्साहन देणारे बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार ! तृणमूल काँग्रेसच्या अशा राष्ट्रघातकी भूमिकेमुळे ‘बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ?’, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे !

हावडा (बंगाल) – ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या काळात हावडा शहरातील ग्रॅण्ड ट्रंक रोड आणि अन्य मुख्य रस्ते शुक्रवारी नमाजपठणासाठी बंद करण्यात येतात. त्यामुळे रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. अनेकांना कार्यालयात पोचण्यातही विलंब होतो. जोपर्यंत रस्ता बंद करून नमाजपठण चालू राहील, तोपर्यंत प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरांच्या जवळच्या प्रमुख रस्त्यांवर हनुमान चालीसाचे पठण करण्यात येईल, अशी चेतावणी भारतीय जनता युवा मोर्चाकडून देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवरच मंगळवार, २५ जून या दिवशी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने येथील हावडा बाली खाल मार्गावर हनुमान चालीसाचे पठण आयोजित करण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF