अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सांगली, २६ जून (वार्ता.) – होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, समाजातील भूमीहीन व्यक्तींना शासनाने भूमी कसण्यासाठी द्यावी, संत रोहिदास महामंडळावर समाजाचा प्रतिनिधी घ्यावा, जात दुरुस्तीसाठी होलार समाजाच्या नावे स्वतंत्र आयोग नेमावा, दुष्काळी तालुक्याला म्हैशाळ-टेंभू योजनेतून बारमाही पाणी सोडण्यात यावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय होलार समाज संघटनेने २४ जूनला जिल्हाधिकारी कायालर्यावर मोर्चा काढला. शेवटी युवा नेते भगवानदास केंगार, आबासाहेब एैवळे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी बापूसाहेब करडे, सचिन हेगडे, आनंद एैवळे, आपासाहेब गेजगे, अजित हातेकर यांच्यासह अनेक समाज बांधव, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF