कोल्हापूर सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने २२ लक्ष वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ! – वनविभाग

कोल्हापूर, २६ जून (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी २२ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून १ जुलै या दिवशी सकाळी ९  वाजता वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने मौजे पारगाव, तात्यासाहेब कोरे, मिलिट्री अ‍ॅकॅडमी, नवे पारगाव येथे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे श्री. दीपक खाडे यांनी दिली.

या वेळी वनीकरण विभागातील अन्य अधिकार्‍यांनी पुढील माहिती दिली.

१. कोल्हापूर जिल्ह्याला ४.४ लाख हरित सेना नोंदणीचे उद्दिष्ट असून ३ लाख ७२ सहस्र नोंदणी पूर्ण झाली आहे.

२. वृक्षांची जोपासना करण्यासाठी जन्माला आलेल्या बाळाचे स्वागत कुटुंबाला रोपे देऊन करणे, विवाहप्रसंगी रोपे भेट देणे, विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यावर, तसेच विजयी उमेदवार यांना रोपे भेट देणे अशाप्रकारे वृक्ष भेट देऊन लोकांनी सहभाग वाढवावा.


Multi Language |Offline reading | PDF