काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडून हिंदूंना हिंसक दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न

हिंदूंना सातत्याने ‘हिंसक’ किंवा ‘असहिष्णु’ म्हणून हिणवणारे काँग्रेसवाले हिंदूंवर अत्याचार करणार्‍या धर्मांधांविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत !

(हे छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)

नवी देहली – कथितरित्या ‘जय श्रीराम’ बोलण्यास नकार दिल्यावर मुसलमानांना मारहाण केल्याच्या घटनेचा आधार घेत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर व्यंगचित्र ‘पोस्ट’ केले आहे. यात एका व्यक्तीला झाडाला बांधण्यात आले आहे आणि जमाव त्याला मारहाण करत आहे. या चित्राच्या खाली ‘जय श्रीराम’ लिहिण्यात आले आहे. या व्यंगचित्रावरून थरूर यांच्यावर सामाजिक माध्यमातून टीका केली जात आहे. ‘अल्ला हु अकबर’ म्हणत मारणार्‍यांच्या विरोधातही शशी थरूर यांनी व्यंगचित्र ‘पोस्ट’ केले पाहिजे’, अशी टीका काही जणांनी केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF