राज्यात सागवानसह विविध मौल्यवान वृक्षांची तस्करी

मुंबई, २५ जून (वार्ता.) – राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, धुळे, यवतमाळ येथे वर्ष २०१४ ते वर्ष २०१८ या ५ वर्षांच्या कालावधीत ८६ सहस्र ९३२ मौल्यवान वृक्षांची तस्करी करण्यात आली. यामध्ये सागवानसह अन्य मौल्यवान वृक्षांचा समावेश आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली. मौल्यवान वृक्षांच्या तस्करीविषयी डॉ. वजाहत मिर्झा यांसह अन्य सदस्यांनी सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला त्यांनी लेखी उत्तर दिले. याविषयी मुनगंटीवार म्हणाले की, वृक्षांची तस्करी रोखण्यासाठी धुळे, नागपूर आणि ठाणे येथे राज्य राखीव दलाची तुकडी नेमली आहे. दुर्गम क्षेत्रामध्ये संपर्क करण्याकरता बिनतारी संदेश यंत्रणा स्थापन करत असल्याचे सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF