साधिकेने केवळ स्वतःतील ‘स्वभावदोष आणि अहंचे पैलू’ लिहिलेली पाटी गळ्यात घालूनही संत भक्तराज महाराज यांची साधकांना घडवण्याची प्रक्रिया अनुभवणे

साधिकेने केवळ स्वतःतील ‘स्वभावदोष आणि अहंचे पैलू’ लिहिलेली पाटी गळ्यात घालूनही तिने संत भक्तराज महाराज यांची साधकांना घडवण्याची प्रक्रिया सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या माध्यमातून अनुभवणे

गुरुपौर्णिमा २०१९
सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर
पू. (सौ.) संगीता जाधव
कु. अमृता मुद्गल

‘एकदा सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव रामनाथी आश्रमात आल्या होत्या. ३.१०.२०१८ या दिवशी मी काही सेवेनिमित्त त्यांच्या खोलीत गेले होते. तेव्हा पू. जाधवकाकू मला म्हणाल्या, ‘‘आजचे दैनिक ‘सनातन प्रभात’ दे.’’ मी पू. काकूंना दैनिक ‘सनातन प्रभात’ दिल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘अमृता, इकडे ये. तुझ्या गळ्यातील पाटीवर काय लिहिले आहे ?’’ नंतर त्यांनी माझ्या गळ्यात घातलेल्या पाटीवर लिहिलेले स्वभावदोष आणि अहंचे पैलू वाचले. त्या मला दैनिक ‘सनातन प्रभात’ने स्पर्श करत (मारत) म्हणू लागल्या, ‘‘मनाने वागते, अपेक्षा करते.’’

तेवढ्यात तेथे सद्गुरु (कु.) अनुताई आल्या. त्यांनी पू. जाधवकाकूंना सांगितले, ‘‘तुम्ही माझ्या वतीनेही अमृताला २ – ३ फटके द्या.’’ तेव्हा माझा कृतज्ञताभाव दाटून आला. मी केवळ गळ्यात पाटी घातली होती. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत नव्हते, तरी देवाने दोन देवींच्या माध्यमातून (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या माध्यमातून) माझ्यावर गोड फुलांचा वर्षाव (चैतन्यमय दैनिक सनातन प्रभातचा स्पर्श) केला.

तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘भक्तांचे काही चुकल्यास संत भक्तराज महाराज (प.पू. बाबा) भक्तांना शिव्या देत किंवा काठीने मारत. त्यामुळे साधक घडत होते. ‘संत भक्तराज महाराज मला या दोन संतांच्या माध्यमातून घडवत आहेत’, असे वाटले.’

– कु. अमृता मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१०.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF