सनातन संस्थेवर बंदीचा कोणताही प्रस्ताव नाही !

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या प्रश्‍नावर केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्तर

  • दक्षिण भारतातील, विशेषतः केरळमधील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून सातत्याने जिहादी कारवाया केल्या जात असतांना तिच्यावर बंदी घालण्याविषयी असदुद्दीन ओवैसी प्रश्‍न का विचारत नाहीत ?
  • बांगलादेशातील आतंकवादी संघटना भारतात कारवाया करत आहेत, त्याविषयी ओवैसी तोंड का उघडत नाहीत ?
  • तेलंगणमध्ये रोहिंग्या मुसलमान घुसखोरी करून रहात आहेत, त्यांना भारतातून हाकलण्यासाठी ओवैसी कृती का करत नाहीत ?

नवी देहली – सनातन संस्थेवरील आरोपांविषयीचे प्रकरण महाराष्ट्रातील आतंकवादविरोधी पथकाकडे आहे. त्यामुळे राज्य सरकार यावर निर्णय घेऊ शकते. केंद्र सरकारच्या स्तरावर पाहिल्यास सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव आम्हाला देण्यात आलेला नाही, असे लेखी उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नावर २५ जून या दिवशी लोकसभेत दिले.

‘महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या आरोपपत्राच्या आधारे सरकार हिंदुत्वनिष्ठ संघटना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे का ?’ आणि ‘जर याचे उत्तर ‘हो’ असेल, तर याची विस्तृत माहिती काय आहे ?’, ‘भारत सरकार देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलून या संघटनांवर बंदी घालणार आहे का ?’, असे प्रश्‍न असदुद्दीन ओवैसी यांनी विचारले होते.


Multi Language |Offline reading | PDF