भारतातून निर्यात होणार्‍या भाज्या आणि फळे विकत घेण्यास साम्यवादी नेपाळ सरकारचा नकार

नेपाळ पूर्णतः चीनच्या कह्यात गेल्याचे हे द्योतक आहे ! भविष्यात नेपाळच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनने भारतविरोधी कारवाया केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

नवी देहली – भारत निर्यात करत असलेल्या भाज्या आणि फळे विकत घेण्यावर नेपाळ सरकारने बंदी घातली आहे. नवीन नियमानुसार काठमांडू येथील प्रयोगशाळेत भाज्या आणि फळे यांची पडताळणी केल्यावर त्यांची विक्री करण्याची अनुमती देण्यात येणार आहे. सध्या भारतातून आलेल्या भाज्या आणि फळे चांगल्या प्रतीची नसल्याने नेपाळने ती परत पाठवली आहेत. (नेपाळमध्ये साम्यवाद्यांचे सरकार आल्यापासून तेथे भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत, त्याचे हे उदाहरण ! – संपादक) त्यामुळे शेकडो ट्रक भाज्या आणि फळे घेऊन भारतात परत येत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF