कोलकातामधून इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांना अटक

तिघे आतंकवादी बांगलादेशी !

भारतातील ५ कोटींहून अधिक बांगलादेशी घुसखोर पुढे आतंकवादी कारवाया करू लागले, तर त्यांना कसे आवरणार ?

कोलकाता – कोलकाता पोलिसांच्या विशेष कृती दलाने इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेच्या महंमद जियाऊर रहमान, ममूर राशिद, महंमद सहीन, रोबिइल इस्लाम या ४ आतंकवाद्यांना अटक केली आहे. यांतील ३ जण बांगलादेशी घुसखोर आहेत, तर एक जण स्थानिक आहे. हे चौघेही बांगलादेशमधील ‘जमात उद दावा’ या आतंकवादी संघटनेसाठीही काम करतात. त्यांच्याजवळून १ भ्रमणभाष संच जप्त करण्यात आला आहे. त्यात वेगवेगळ्या ठिकाणांची छायाचित्रे, व्हिडीओ आणि आतंकवादी विचारांचे संदेश होते. रोबिइल हा बंगालचा असून अन्य तिघे बांगलादेशचे नागरिक आहेत. त्यांनी भारतात आश्रय घेतला होता आणि येथे राहून ते संघटनेचा प्रचार आणि प्रसार करत होते. यासाठी ते सामाजिक माध्यमांचा वापर करत होते.


Multi Language |Offline reading | PDF