रामनाथी (गोवा) येथे अधिवेशनासाठी आलेल्या जिज्ञासूने रामनाथी आश्रम पाहिल्यावर दिलेला अभिप्राय

अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !

१. अधिवक्ता रमेश पंडा, संस्थापक आणि अध्यक्ष, कलिंग आश्रम, ब्रह्मपूर, ओडिशा. (२६.५.२०१९)

अ. ‘समाजातील वातावरणापेक्षा आश्रमातील वातावरण आध्यात्मिक (सात्त्विक) आहे.

आ. येथे मला शिस्त आणि नीटनेटकेपणा शिकायला मिळाला. त्याचप्रमाणे प्रत्येक साधकात एकमेकांविषयी पारदर्शकता असल्याचे आढळून आले.’

२. श्रीमती अनन्या पंडा, गंजम, ओडिशा

‘आश्रमात येता क्षणी मला सुगंधाची अनुभूती आली आणि माझ्याभोवती चैतन्य असल्याचे जाणवले. मला आश्रमात येण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.’

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF