(म्हणे) ‘तबरेज नावाच्या तरुणाचा ‘सनातनी धर्मांधवाद्यांनी’ बळी घेतला !’

काँग्रेसचे आमदार नसीम खान यांचे सनातनद्वेषी विधान

काश्मीर खोर्‍यात आतंकवाद्यांनी जिहादच्या नावाखाली लक्षावधी हिंदू आणि पंडित यांना बेघर करून सहस्रो हिंदूंची हत्या केली. आतापर्यंत ठिकठिकाणी घडवलेल्या दंगलीत धर्मांधांनी अनेक हिंदूंना ठार मारले आहे. अशा घटनांविषयी आमदार नसीम खान यांनी आतापर्यंत चकार शब्दही काढला नाही. याचे कारण म्हणजे ते आतंकवादी धर्मांध होते. त्यामुळे केवळ सनातनवर टीका करण्याऐवजी नसीम खान यांनी इतिहासातील सत्य माहितीचा अभ्यास करून वक्तव्य करावे. – संपादक

मुंबई – दुसर्‍यांदा सत्तेवर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत जनतेला विश्‍वासात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र एका मासातच पुन्हा एकदा ‘मॉब लिंचींग’च्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोदी यांच्या जुमलेबाजीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. बिहारमधील जमशेदपूर येथे तबरेज नावाच्या एका युवकाचा ‘सनातनी धर्मांधवाद्यांनी’ बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो, तसेच या घटनेला उत्तरदायी असणार्‍यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे आमदार आणि विधीमंडळ उपनेते नसीम खान यांनी २४ जूनला विधानसभा परिसरात पत्रकारांशी बोलतांना केले. (तबरेज नावाच्या मुलाविषयी घडलेली घटना दुर्दैवीच आहे; मात्र कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या वेळी एका हिंदु तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्या वेळी आमदार नसीम खान निषेध का केला नाही ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF