मेहुल चोक्सी यांचे नागरिकत्व रहित करून त्यांना भारताच्या कह्यात देणार !

अँटिग्वाच्या पंतप्रधानांचे आश्‍वासन

अँटिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन

नवी देहली – पंजाब नॅशनल बँकेतील १३ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी यांना लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. सध्या चोक्सी अँटिग्वा देशामध्ये वास्तव्याला आहेत. ‘लवकरच चोक्सी यांचे नागरिकत्व रहित करणार असून त्यांना भारताच्या कह्यात देण्यात येईल’, असे आश्‍वासन अँटिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी दिले आहे.

ब्राऊन म्हणाले की, कोणत्याही प्रकारचे आरोप असलेल्या व्यक्तीला देशात थारा देणार नाही. चोक्सीशी संबंधित संपूर्ण प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारित असल्याने अँटिग्वाकडून प्रक्रियेचे पालन केले जाईल. या प्रकरणाची माहिती भारत सरकारला देण्यात आली आहे. चोक्सी यांना सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात येईल. जेव्हा त्याच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक रहाणार नाही, तेव्हा त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया चालू करण्यात येईल.


Multi Language |Offline reading | PDF