केरळमधील धर्मांधांनी हिंदूंमध्ये निर्माण केलेली दहशत !

केरळ भारतात आहे कि पाकिस्तानात ? जे सध्या जम्मू-काश्मीरमध्ये होत आहे, तसे आता केरळमध्येही होत आहे. ज्या केरळमध्ये सुखनैव हिंदु संस्कृती नांदत होती, तेथे आज ‘हिंदु’ नावही घेणे, म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. त्यामुळे ही स्थिती पालटण्यासाठी आता हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !

‘एक वर्षापूर्वी मी केरळमधील एका भागात धर्मप्रसारासाठी गेलो होतो. तेव्हा तेथे एका साधकासमवेत मी एका उद्योगपतींना संपर्क करण्यास गेलो. मी त्यांना माझा परिचय करून दिला आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी माहिती सांगण्यास प्रारंभ केला. त्याच वेळी त्या उद्योगपतींनी ‘मला यात रस नाही’, असे म्हणत आम्हाला जायला सांगितले. आम्ही घरी परत आलो. त्यानंतर आम्ही त्यांना दूरभाषवर संपर्क केला. तेव्हा कळले की, त्यांना धर्मांधांची भीती वाटते. ते म्हणाले, ‘‘मला हिंदुत्वनिष्ठांसमवेत कुणी पाहिले, तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे मला हे सर्व नको आहे. येथील परिस्थिती अतिशय वाईट आहे. याविषयी तिकडे तुम्हाला काही कळणार नाही. नंतर मला येथे कोण वाचवेल ?’’

– श्री. चंद्र मोगेर, दक्षिण कन्नड, कर्नाटक.


Multi Language |Offline reading | PDF