सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावरील संकटांच्या निवारणार्थ रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात ‘बगलामुखी याग’

हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील श्री बगलामुखीदेवीच्या मूळ स्थानीही केला याग

सनातन आश्रमात बगलामुखी यागाच्या वेळी करण्यात आलेल्या पूजेच्या वेळी केलेली मांडणी

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावरील संकटांच्या निवारणार्थ जेष्ठ कृष्ण पक्ष षष्ठी अर्थात् २३ जून २०१९ या दिवशी येथे ‘बगलामुखी याग’ करण्यात आला. या यागाचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठशाळेेचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी आणि पाठशाळेतील पुरोहित यांनी केले.

डावीकडून श्री. सिद्धेश करंदीकर, श्री. दामोदर वझेगुरुजी, श्री. इशान जोशी, यज्ञात पूर्णाहुती देतांना श्री. अमर जोशी आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

श्रीगणेश आणि श्री बगलामुखीदेवी यांना भावपूर्ण प्रार्थना करून यागाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यागाचा संकल्प आणि श्री गणपति पूजन केले. संकट निवारण्यासाठी करण्यात आलेल्या यागामध्ये बगलामुखी ब्रह्मास्त्र मंत्र म्हणून आहुती देण्यात आली. याप्रसंगी सनातनचे सद्गुरु, संत आणि आश्रमातील साधक उपस्थित होते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात याग चालू असतांनाच श्री बगलामुखीदेवीच्या मूळ स्थानी, म्हणजे हिमाचल प्रदेशातील कांगडा येथेही सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या उपस्थितीत श्री बगलामुखी याग करण्यात आला. या यागापूर्वी तेथील मंदिरातील पुरोहितांनी देवीचा ३२ सहस्र जप पूर्ण केला. या यागाचे पौरोहित्य या मंदिरातील ७ पुरोहितांनी केले.

श्री बगलामुखीदेवीचे पूजन करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, समवेत श्री बगलामुखीदेवीच्या मंदिरातील पुरोहित आणि साधक

या मंदिरातील स्त्री महंतांनी सांगितले, ‘‘श्री बगलामुखीदेवीची तुमच्यावर सदैव कृपा असून तुमचे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल.’’

बगलामुखी याग पूर्ण झाल्यावर तेथील पुरोहितांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना श्री हनुमान आणि श्री कालभैरव यांच्या चरणी प्रार्थना करायला सांगितली. ‘यज्ञाचे रक्षण श्री हनुमान आणि कालभैरव करतात’, असेही त्यांनी सांगितले. ‘यातून ‘महर्षींनी रामनाथी येथील सनातन आश्रमातील यज्ञकुंड परिसरामध्ये श्री हनुमान आणि श्री कालभैरव यांचे देऊळ (घुमटी) का बांधायला सांगितले ?’, याचा उलगडा झाला’, असे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले.

रामनाथी येथील सनातन आश्रमात बगलामुखी याग चालू असतांना आलेल्या दैवी प्रचीती

  • चैतन्यमय वातावरणात झालेल्या या यागाचा सूक्ष्म स्तरावर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून आला.
  • पूजनाला आरंभ होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी संकल्प आणि श्री गणपतिपूजन केल्यावर पाऊस बंद झाला अन् पूर्ण यागाच्या कालावधीत पाऊस पडला नाही. याग पूर्ण झाल्यावर परत पाऊस आला. यातून ‘वरूण देवतेनेही यागासाठी साहाय्य केले’, असे लक्षात आले.
  • याग चालू असतांना यज्ञस्थळी असलेल्या श्री हनुमंताच्या घुमटीमध्ये लालसर छटा पसरली होती, असे लक्षात आले.
  • याग चालू असतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा तोंडवळा पुष्कळ लालसर झाला होता.
  • यागाच्या वेळी तेथे उष्णता असतांनाही माशा आल्या होत्या. त्यातील अनेक माशा यज्ञकुंडाला चिटकून होत्या. त्या उडत नव्हत्या. ‘देवीच्या शक्तीमुळे माशांचे स्तंभन झाले आहे’, असे यज्ञस्थळी उपस्थित असलेले संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या लक्षात आले.


Multi Language |Offline reading | PDF