सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना भूमी न मिळाल्याने त्यांच्यामध्ये अन्यायाची भावना

३९ हुतात्मा सैनिकांंपैकी केवळ ३ सैनिकांच्या कुटुंबियांना भूमी संमत

सावंतवाडी – हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या पत्नीला किंवा कायदेशीर वारसाला शासनाकडून भूमी दिली जाते; मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ३९ हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांपैकी केवळ ३ हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना भूमी देण्यास मान्यता मिळाली आहे. हा हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांवरील अन्याय आहे. याविषयी योग्य ती कार्यवाही करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे, असा आरोप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांनी केला आहे. (घरादाराचा त्याग करून देशाच्या रक्षणासाठी कार्य करत असतांना हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या नातेवाइकांना शासनमान्य सोयीसुविधा देण्यात चालढकलपणा करणे, हा सैनिकांप्रती कृतघ्नपणा ठरेल ! – संपादक) या विषयाला अनुसरून न्याय मिळावा, यासाठी या कुटुंबियांनी भाजपचे माजी आमदार राजन तेली, भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली. त्यानंतर माजी आमदार तेली यांनी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी प्रांताधिकारी खांडेकर यांनी ‘हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना भूमी लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करू, तसेच आलेले प्रस्ताव लगेच मार्गी लावू’, असे आश्‍वासन दिले.


Multi Language |Offline reading | PDF